1 Thessalonians 4:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आम्ही तुम्हांला आता जे काही शिकवीत आहोत, ती प्रभूची शिकवण आहे:प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत उरलेले ते आपण निधन पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वतः प्रभू येशूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की आपण जे जिवंत आहोत आणि प्रभूच्या आगमनासमयी जिवंत असू, ते प्रभूला भेटण्यासाठी, जे आपल्यापूर्वी मरण पावले आहेत, त्यांच्या आधी, वर घेतले जाणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.