1 Thessalonians 4:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कोणी ह्या गोष्टीचे उल्‍लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि या गोष्टीसंबंधात कोणीही आपल्या बंधू किंवा भगिनींचे अयोग्य करून गैरफायदा घेऊ नये. याबद्दल आम्ही तुम्हाला आधी सांगून ठेवले होते व इशारा दिला होता की असे पाप करणार्‍यांना प्रभू शिक्षा देतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावलेही होते.