1 Timothy 1:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी मासेदोनियाला जात असता तुला कळकळीने विनंति केल्याप्रमाणे तू इफिस येथे राहावेस असे माझे म्हणणे आहे. यासाठी की, काही ठराविक लोकांना खोटे शिक्षण देऊ नका अशी तुला त्यांना आज्ञा करता यावी. किंवा
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी मासेदोनियाला जाताना तुला विनंती केली होती त्यानुसार तू इफिस येथे राहावे, अशी माझी इच्छा आहे. तेथे काही जण लोकांना चुकीचे धर्मशिक्षण देत आहेत. त्यांना ते बंद करण्याविषयी तू ताकीद दे
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली, ह्यासाठी की, तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मासेदोनियास जाताना मी तुला सांगितल्याप्रमाणे, विनंती करतो इफिस येथेच राहा आणि चुकीचे शिक्षण देणार्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न कर आणि ज्यांच्याकडून विश्वासातील परमेश्वरासंबंधी रचना न होता, वाद मात्र तयार होतात, अशा गोष्टींवर आणि अखंडित वंशावळ्यांवर चित्त त्यांनी ठेवू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.