1 Timothy 1:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणजे हे जाणून घेऊन की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर नियमशास्त्राचा भंग करणाऱ्या आणि बंडखोर लोकांसाठी, तिरस्तकरणीय लोकांसाठी, पापयांसाठी, भक्तिहीन आणि अधर्मी लोकांसाठी, वडिलांना ठार मारणाऱ्या, आईला ठार मारणाऱ्यासाठी,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक