1 Timothy 3:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे. ती मंडळी सत्याचा खांब व पाया अशी आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी देवाची ख्रिस्तमंडळी आहे तीत म्हणजे देवाच्या जिवंत घराण्यात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.