1 Timothy 4:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधुभगिनींना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी आध्यात्मिक पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.