1 Timothy 5:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांची काळजी घेऊन आपला धर्म प्रत्यक्षात आणावा आणि अशा प्रकारे आपल्या आईवडिलांची किंवा आजीआजोबांची परतफेड करावी. कारण हे देवाला मान्य आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली, तर त्यांनी प्रथम आपल्या घरातल्या कुटुंबीयांबरोबर धार्मिकतेने वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे; कारण हे देवाला आवडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.