1 Timothy 6:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी विश्वासापासून दूर जा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे तीमथ्या, जी ठेव तुला सोपविली आहे तिचे रक्षण कर आणि अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि ज्ञानाच्या फुशारक्या मारणार्‍याबरोबर मूर्खपणाचे वाद वर्ज्य कर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.