2 Chronicles 10:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामने त्याला इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करुन त्याला मरेपर्यंत मारले. इकडे रहबामने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरुशलेमला पळून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा हदोराम ह्याला पाठवले; त्याला इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. ह्या प्रकारे इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली ती आजवर चालू आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हदोराम जो मजुरी कामकर्यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमेला पळून गेला.