2 Chronicles 11:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमला आल्यावर रहबामने 1,80,000 उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्राएलशी युध्द करुन स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेस आल्यावर रहबामाने यहूदाचा व बन्यामिनाचा वंश ह्यांतून एकंदर एक लाख ऐंशी हजार निवडक योद्धे जमा केले; इस्राएलाशी लढाई करून रहबामाच्या हाती राज्य परत यावे असा ह्यात हेतू होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करणारे आणि रेहोबोअमला राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.