2 Chronicles 13:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनचे वंशज आहेत. लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे. आम्ही त्याला सोडले नाही; आणि परमेश्वराची सेवाचाकरी करणारे जे याजक आमच्याजवळ आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.