2 Chronicles 13:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग कुचकामी आणि वाईट माणसांशी यराबामशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा मुलगा रहबाम याच्या विरुद्ध होती. रहबाम तरुण आणि अनुभवी होता. त्याला यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याजवळ हलके व अधम लोक जमले आहेत आणि शलमोनाचा पुत्र रहबाम तरुण व अल्लड असून त्याच्याशी सामना करण्यास समर्थ नाही म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यास कंबर कसली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कुचकामी गुंडांची टोळी त्याच्या सभोवती गोळा झाली व त्यांनी शलोमोनचा पुत्र रेहोबोअमचा विरोध केला, जो तेव्हा बालक असून व निर्णयक्षमता नसलेला होता व त्यांचा सामना करण्यास असमर्थ होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरूद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता. त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.