2 Chronicles 16:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आपण आपसात एक करार करु. आपल्या दोघांच्या वडीलांमध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने - रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“माझ्या बापाचा व आपल्या बापाचा सलोखा होता तसा आपला व माझा सलोखा होवो; तर पाहा; मी आपणाला सोने व चांदी पाठवली आहे. इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्याशी केलेला करार मोडून टाका म्हणजे तो माझ्यामागे लागण्याचे सोडून देईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि म्हटले, “माझ्या व तुझ्या वडिलांमध्ये होता तसा तुझ्या व माझ्यात एक करार असावा. पाहा, मी तुला चांदी व सोने पाठवित आहे. तर आता इस्राएलचा राजा बाशा याच्याशी असलेला तुझा करार मोड म्हणजे तो माझ्यापासून निघून जाईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आपण आपसात एक करार करू आपल्या दोघांच्या पित्यामध्येही तसा करार केलेला होता मी माझ्याकडचे सोने व रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”