2 Chronicles 16:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा आसाने मग सर्व यहूदींना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आसा राजाने सर्व यहूदी लोकांना बोलावून आणले व जे दगड व जी लाकडे घेऊन बाशा रामा नगराची तटबंदी करत होता ती त्याने काढून नेली आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.