2 Chronicles 16:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे येऊन म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भरवसा ठेवला नाहीस व अरामाच्या राजावर भरवसा ठेवला म्हणून अरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचवेळेस हनानी हा संदेष्टा यहूदीयाचा राजा आसा याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “तुम्ही अरामच्या राजावर भरवसा ठेवला आणि तुमचे परमेश्वर याहवेह यांच्यावर ठेवला नाही, या कारणाने अरामच्या राजाचे सैन्य तुमच्या हातून निसटले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यावेळी हनानी नावाचा द्रष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्यास म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामाच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे.