2 Chronicles 18:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबने बरीच गईगुरे आणि शळ्यामेंट्या यांचे बळि? दिले. अहाबने यहोशाफाटला रामोथ - गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही वर्षे लोटल्यावर तो शोमरोन येथे अहाबाच्या भेटीस गेला. त्या प्रसंगी अहाबाने त्याच्यासाठी व त्याच्याबरोबरच्या लोकांसाठी पुष्कळ मेंढरे व बैल कापले आणि आपल्याबरोबर रामोथ-गिलादावर चढाई करण्यास त्याने त्याला प्रवृत्त केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही वर्षानंतर तो शोमरोनला अहाबाला भेटण्यास गेला. अहाबाने त्याच्यासाठी व त्याजबरोबर आलेल्या लोकांसाठी अनेक मेंढरे व गुरे कापली व त्याने रामोथ-गिलआदवर हल्ला करावा अशी त्याला विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला. त्याप्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्यामेंढ्या यांचे बली दिले. अहाबाने यहोशाफाटाला रामोथ-गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले.