2 Chronicles 18:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या सरदारांनी यहोशाफाटला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून त्यांनी यहोशाफाटकडे मोहरा वळवला. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रथांवरील त्या सरदारांनी यहोशाफाटास पाहिले तेव्हा त्यांना वाटले की हाच इस्राएलाचा राजा असावा; म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; पण यहोशाफाटाने आरोळी ठोकली तेव्हा परमेश्वराने त्याला साहाय्य केले. देवाने त्यांना त्याच्याकडून निघून जाण्यास प्रवृत्त केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण यहोशाफाटने मोठ्याने धावा केला, आणि याहवेहने त्याला मदत केली. परमेश्वराने त्यांना त्याच्यापासून दूर नेले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, “हाच अहाब इस्राएलचा राजा.” म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले.