2 Chronicles 19:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर यहोशाफाटाने यरुशलेममध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वडीलधारी मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेममधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेतही यहोशाफाटाने लेवी व याजक आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांना परमेश्वराच्या बाबतीत न्याय करण्यास व वादाचा निकाल करण्यास नेमले. मग ते यरुशलेमेत परत आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेममध्येही, यहोशाफाटने काही लेवी, याजक आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना याहवेहच्या नियमांचे पालन करण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी नियुक्त केले. ते यरुशलेममध्ये राहत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर यहोशाफाटाने यरूशलेमामध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वयस्कर मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरूशलेमामधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता. ते यरूशलेमेत राहीले