2 Chronicles 2:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जितक्या लाकडांचे आपल्याला प्रयोजन आहे तेवढे लबानोनाहून कापून त्याचे तराफे करून आमचे लोक जलमार्गाने यापो येथे पोचते करतील; तेथून ते आपण यरुशलेमेला घेऊन जावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”