2 Chronicles 2:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शलमोनाने त्यापैकी 70,000 जणांना ओझी वाहायला निवडले आणि 80,000 लोकांना डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या 3,600 उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांतून त्याने सत्तर हजार ओझेकरी, ऐंशी हजार पहाडातले धोंडे काढणारे व तीन हजार सहाशे त्यांच्यावर देखरेख करणारे नेमले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांस डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.