2 Chronicles 21:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे यहोशाफाट वारला. त्याचे त्याच्या पूर्वजांजवळ दफन केले. दावीद नगरात त्याला पुरले. यहोशाफाटच्या जागी त्याचा मुलगा यहोराम गादीवर बसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशाफाट हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये दावीदपुरात मूठमाती देण्यात आली, त्याचा पुत्र यहोराम त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे यहोशाफाट मरण पावला. त्यास त्याच्या पूर्वजांजवळ दावीद नगरात दफन केले. यहोशाफाटाच्या जागी त्याचा पुत्र यहोराम त्याच्याजागी राजा झाला.