2 Chronicles 21:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामला असा संदेश आला: “परमेश्वरा देवाने असे सांगितले आहे. तुझे पूर्वज दावीद यांचा हा परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणतो, ‘यहोराम, तुझे आचरण आपले वडील यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एलीया संदेष्ट्याकडून त्याला एक लेख आला तो असा: “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू आपला बाप यहोशाफाट ह्याच्याप्रमाणे व यहूदाचा राजा आसा ह्याच्याप्रमाणे चालला नाहीस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला: तुझे पूर्वज दावीद यांचा परमेश्वर म्हणतो, “यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही.