2 Chronicles 21:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण परमेश्वराने दावीदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दावीदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दावीदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दावीदाशी करार केला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि जो करार परमेश्वराने दाविदाशी केला होता त्यामुळे आणि त्याने त्याचा व त्याच्या वंशजांचा दीप सर्वकाळ राहील असे वचन दिले होते त्यामुळे तो दाविदाचे घराणे नाहीसे करीना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने दावीदाच्या घराण्याचा नाश केला नाही. कारण त्यांनी त्याच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता.