2 Chronicles 22:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण यहोशबाथ हिने अहज्याचा मुलगा योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामची मुलगी आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथने योवाशला लपवल्यामुळे अथल्या त्याला मारु शकली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी राजकन्या यहोशबाथ3 हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला लपवून ठेवले. ह्याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी यहोयादा याजकाची पत्नी यहोशबाथ (जी अहज्याची बहीण होती) तिने योवाशाला अथल्येपासून लपवले म्हणून तिला त्याचा वध करता आला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु यहोशेबा, यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.