2 Chronicles 22:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहज्या (किंवा यहोआहाज) योरामला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी धाडले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामबरोबर निमशीचा मुलगा येहू याला भेटायला गेला. अहाबच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगत धरली होती; अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी ह्याला अभिषिक्त केले होते; त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहज्याहची यहोरामाशी भेट यामधून परमेश्वराने अहज्याहचा नाश केला. जेव्हा अहज्याह तिथे आला तेव्हा तो योरामबरोबर निमशीचा पुत्र येहूला भेटण्यासाठी गेला, ज्याला अहाबाच्या घराण्याचा नाश करण्यासाठी याहवेह यांनी अभिषेक केला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.