2 Chronicles 23:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्याला तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यहोयादा याजकाने सेनेवरील शतपतींना बाहेर आणून आज्ञा केली की, “तिला सैन्याच्या रांगेतून बाहेर काढा; तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा;” कारण परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये असे याजकाने सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्यांना बाहेर पाठवले, आणि त्यांना सांगितले: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारू नये.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”