2 Chronicles 23:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेवींनी राजाच्या निकट राहायचे. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायाचा प्रयत्न केल्यास त्याला ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेव्यांपैकी प्रत्येक मनुष्याने आपापल्या हाती शस्त्रे घेऊन राजासभोवती उभे राहावे; कोणी मंदिराच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर येईल-जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक लेवींनी हातात शस्त्र घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.