2 Chronicles 24:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांवर देवाचा कोप झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती व इतर मूर्ती ह्यांची उपासना करू लागले. ह्या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदावर व यरुशलेमेवर भडकला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचे मंदिर सोडून दिले, आणि अशेरा खांब आणि मूर्त्या यांची पूजा केली. त्यांच्या या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदीया आणि यरुशलेम यांच्यावर आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला.