2 Chronicles 24:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अरामी योवाशला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या मुलाला, जखऱ्याला योवाशने मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीदनगरात लोकांनी त्याला मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असता त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्तानात दिली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा अरामी लोक मागे फिरले, तेव्हा त्यांनी योआशला गंभीर जखमी करून सोडले. यहोयादा या याजकाच्या मुलाचा खून करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्यांनी त्याला त्याच्या पलंगावर ठार मारले. म्हणून तो मरण पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले, परंतु राजांच्या कबरेत नव्हे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अरामी सेना योवाशाला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशाच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या पुत्राला, जखऱ्याला योवाशाने जीवे मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशाला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीद नगरात लोकांनी त्यास मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.