2 Chronicles 25:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नेमक्या याचवेळी इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ - होरोनपासून थेट शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली. 3000 लोकांना जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करुन न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जे सैन्य लढाईस आपल्याबरोबर न नेता अमस्याने परत लावून दिले होते त्या सैन्याने शोमरोनापासून बेथ-होरोनापर्यंत यहूदाच्या नगरांवर हल्ला केला; त्यांनी त्यांतल्या तीन हजारांना ठार करून पुष्कळ लूट नेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दरम्यान, अमस्याहने ज्या सैन्याला परत पाठवले होते आणि युद्धात भाग घेऊ दिला नव्हता, त्यांनी शोमरोनपासून बेथ-होरोनपर्यंत तेथील यहूदीयाच्या नगरांवर हल्ला केला. त्यांनी तीन हजार लोकांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात लूट घेऊन गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नेमक्या याचवेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून सरळ शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली, तीन हजार लोकांस जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.