2 Chronicles 25:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनच्याच एका गंधसरुला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलींचे माझ्या मुलाशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या ह्याला सांगून पाठवले की, “लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्या एका गंधसरूकडे मागणी केली की, ‘तुझी मुलगी माझ्या मुलास दे.’ लबानोनात असलेला एक वनपशू त्या वाटेने गेला, त्याने ते काटेझुडूप पायांखाली तुडवून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इस्राएलचा राजा योआश याने यहूदीयाचा राजा अमस्याह याला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशाने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले.