2 Chronicles 25:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘मी अदोमचा पारभव केला.’ असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. उगीच नसत्या फंदात पडून अडचणीत येऊ नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत:च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू म्हणतोस, ‘मी अदोमाचा मोड केला,’ त्यामुळे तुझे हृदय उन्मत्त होऊन तू फुशारकी मारत आहेस; आपल्या घरी बस; तू पतन पावशील व तुझ्याबरोबर यहूदा पतन पावेल; तू आपण होऊन अरिष्टास का आमंत्रण करत आहेस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू स्वतःला म्हणतोस की, तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि आता तू उद्धट व गर्विष्ठ झाला आहेस. परंतु घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश तू का करावा?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी अदोमचा पराभव केला. असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वत:ला उगीच अडचणीत पाडू नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वत:च्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”