2 Chronicles 25:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सर्व सोनेरुपे तसेच मंदिरातील उपकरणी, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेअदोमची होती. राजमहालातील चीजवस्तूही योवाशने लुटली. काही जणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व सोने, रुपे व सर्व पात्रे जी त्याला देवाच्या मंदिरात ओबेद-अदोम ह्याच्याजवळ सापडली ती सगळी व राजमंदिरातील खजिना व कैदी घेऊन तो शोमरोनास परत गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या मंदिरातील सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, जी ओबेद-एदोमच्या देखरेखीखाली होते. आणि राजवाड्याच्या तिजोरीसह कैद्यांना घेऊन तो शोमरोनास परतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद-अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योवाशाने लुटल्या. काहीजणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.