2 Chronicles 26:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली; त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली; त्याला इतके विलक्षण साहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेममध्ये त्याने बुरुजावर आणि कोपऱ्यांवरील संरक्षणांसाठी वापर करण्यासाठी शोध लावलेली उपकरणे बनविली. ज्यामुळे सैनिक बाण मारू शकतील आणि भिंतीवरून मोठे दगड फेकू शकतील. त्याची किर्ती दूर पसरली, कारण तो सामर्थ्यशाली होईपर्यंत त्याला खूप मदत झाली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरूशलेमामध्ये बनवून घेतली. ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोपऱ्यावर बसवली. ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मारा करीत असत. उज्जीया फार प्रसिध्द झाला. उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले. त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला.