2 Chronicles 28:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलवर परमेश्वराचा कोप होईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ह्या पाडाव केलेल्या लोकांना आत आणू नका; तुम्ही जो संकल्प केला आहे त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराचे अपराधी होऊ व आमच्या पापांत व दोषात भर पडेल; आमचा दोष तर मोठा आहे आणि इस्राएलावर बहुत कोप भडकला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणाले, “तुम्ही त्या कैद्यांना इकडे आणू नये, नाहीतर याहवेहसमोर आपण दोषी ठरले जाऊ. आपल्या पापामध्ये आणि दोषामध्ये आणखी भर घालण्याचा तुमचा विचार आहे काय? कारण आधीच आमचे पाप मोठे आहे आणि त्यांचा क्रोधाग्नी आम्हा इस्राएलींवर भडकलेला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलावर परमेश्वराचा कोप होईल.”