2 Chronicles 28:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ - शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, गदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. व तेथे ते राहायला गेले.