2 Chronicles 28:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने हिम्मोनपुत्राच्या खोर्यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतींना अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पण केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने बेन हिन्नोमच्या खोऱ्यात बलिदानांचे यज्ञ केले आणि त्याच्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या पुत्रांना त्याने अग्नीमध्ये आहूती देवून बली दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांस तेथून घालवले होते.