2 Chronicles 31:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा सादोकच्या घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हाला पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या प्रजेला खरोखरच दुवा दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सादोक घराण्यातला अजर्‍या मुख्य याजक त्याला म्हणाला, “लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हांला पोटभर खायला मिळून पुष्कळ शिल्लकही राहते; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे; जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सादोकच्या घराण्यातील अजर्‍याह या मुख्य याजकाने उत्तर दिले, “लोकांनी याहवेहच्या मंदिरात त्यांची वर्गणी आणण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आपल्याकडे खाण्यास पुरेसे आणि भरपूर असे उरले आहे, कारण याहवेहनी त्यांच्या लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि हा मोठा भाग उरला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सादोकाचा घराण्यातला मुख्य याजक अजऱ्या हिज्कीयाला म्हणाला की, “लोक परमेश्वराच्या मंदिरात धान्य व या सगळ्या गोष्टी अर्पण करायला लागल्यापासून आम्हास पोटभर खायला मिळू लागले आहे. अगदी तृप्त होईपर्यंत खाऊनही एवढे उरले आहे. परमेश्वराने आपल्या लोकांस आशीर्वाद दिला आहे, म्हणून तर इतके शिल्लक राहीले आहे.”