2 Chronicles 31:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहात असत त्या गावांमध्ये शेत - शिवारे होती. काही अहरोनचे वंशज नगरांमध्येही राहात होते. तेव्हा त्या नगरातील माणसांची नावानिशी निवड करुन त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोवंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणे जे अहरोन वंशातले याजक त्यांच्या प्रत्येक नगरात व शिवारात राहत असत त्या सर्व याजक पुरुषांना आणि लेव्यांपैकी ज्यांची वंशावळीत नोंद झाली होती त्यांनाही वाटणी देण्यासाठी माणसे नेमली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजक, जे अहरोनाचे वंशज होते ते त्यांच्या गावांच्या आसपासच्या शेतजमिनीवर किंवा इतर कोणत्याही नगरांमध्ये राहत होते, त्यांच्यातील प्रत्येक पुरुषाला आणि लेव्यांच्या वंशावळीमध्ये ज्यांची नोंद झाली होती, त्या सर्वांना भागांचे वाटप करण्यासाठी नावानुसार पुरुष नेमले गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन वंशातील काही याजकांची लेवी राहत असत त्या गावांमध्ये शेत-शिवारे होती. काही अहरोनाचे वंशज नगरांमध्येही राहत होते. तेव्हा त्या नगरातील मनुष्यांची नावानिशी निवड करून त्यांना आपल्या उत्पन्नातला वाटा या अहरोन वंशजांना द्यायला निवडले होते. वंशावळीत नोंदवलेले सर्वजण आणि पुरुष लेवी यांना हा वाटा मिळे.