2 Chronicles 31:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार याजक व लेवी ह्यांना मनापासून आपली कामे करता यावीत म्हणून त्यांचा भाग त्यांना द्यावा अशी आज्ञा त्याने यरुशलेमेत राहणार्‍या लोकांना केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना याजक आणि लेवींना त्यांचा योग्य भाग देण्याची आज्ञा केली, ज्यामुळे ते स्वतःला याहवेहच्या नियमशास्त्रासाठी समर्पित करू शकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांस लेवी व याजक यांना द्यावा लागत असे, तो त्यांनी द्यावा अशी यरूशलेमेतील लोकांसाठी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले.