2 Chronicles 32:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरुशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपल्या सर्व सैन्यासह लाखीशासमोर तळ देऊन राहिला होता. त्याने आपले सेवक हिज्कीया राजाकडे व यरुशलेमेत असलेल्या यहूद्यांकडे पाठवले व त्यांना निरोप कळवला की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर, जेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब आणि त्याच्या सर्व सैन्याने लाखीशला वेढा घातला, तेव्हा त्याने यहूदीयाचा राजा हिज्कीयाह राजा आणि यहूदीयाच्या सर्व लोकांसाठी हा संदेश त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर देऊन त्यांना यरुशलेमकडे पाठवले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अश्शूरचा राजा सन्हेरीब याने लाखीशाचा पराभव करण्याच्या हेतूने आपल्या सैन्यासह लाखीश नगराजवळ तळ दिला होता. तेथून त्याने यहूदाचा राजा हिज्कीया आणि यरूशलेममधील यहूदी लोक यांच्यासाठी आपल्या सेवकांमार्फत निरोप पाठवला.