2 Chronicles 35:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे काम उरकल्यावर लेवींना स्वत:साठी आणि अहरोनचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर, त्यांनी स्वतःसाठी आणि याजकांसाठी तयारी केली, कारण याजक, अहरोनाचे वंशज हे रात्र होईपर्यंत होमार्पण आणि चरबीचे भाग अर्पण करत होते. म्हणून लेवींनी स्वतःसाठी आणि अहरोन वंशज याजकांसाठी तयारी केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे काम उरकल्यावर लेवींना स्वत:साठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.