2 Chronicles 35:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरुशलेमला नेले. यरुशलेममध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना फार दु:ख झाले. 25यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते गाण्याचा पायंडाच पडला आहे. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत. 26-27आपल्या कारकिर्दीत योशीयाने ज्या इतर गोष्टी केल्या त्या ‘इस्राएल आणि यहूदा राजांचा इतिहास’ या पुस्तकात अथपासून इतीपर्यंत नोंदवलेल्या आहेत. त्याची परमेश्वरावरची निष्ठा आणि त्याचे आज्ञापालन याविषयी त्यात लिहिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला रथावरून उतरवून त्याच्या दुसर्‍या रथावर बसवले व यरुशलेमेस नेले; तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; तेव्हा सर्व यहूदा व यरुशलेम ह्यांनी योशीयासाठी शोक केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी योशीयाहला त्याच्या रथातून बाहेर काढले, त्याला त्याच्या दुसऱ्या रथात ठेवले आणि यरुशलेमास आणले, तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरांमध्ये पुरण्यात आले आणि सर्व यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांनी त्याच्यासाठी शोक केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरूशलेमेला नेले. यरूशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांस फार दु:ख झाले.