2 Chronicles 35:25 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यिर्मयाहने योशीयासाठी विलापगीत लिहिले आणि आजपर्यंत सर्व स्त्री-पुरुष गायक विलापामध्ये योशीयाहचे स्मरणोत्सव करतात. इस्राएलमध्ये ही एक परंपरा झाली आहे आणि विलाप गीतांमध्ये त्या लिहिलेल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.