2 Chronicles 36:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शिवाय याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडीलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरुशलेममधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळदाण केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले, आणि जे मंदिर परमेश्वराने यरुशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याव्यतिरिक्त याजकांचे सर्व पुढारी आणि लोक अधिकच अविश्वासू झाले, त्यांनी इतर राष्ट्रांच्या सर्व घृणास्पद प्रथांचे पालन केले आणि यरुशलेममध्ये पवित्र केलेले याहवेह यांचे मंदिर त्यांनी अशुद्ध केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडिलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रमाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरूशलेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळधान केली.