2 Chronicles 8:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बालाथ आणि अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुशलेम, लबानोनसकट आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बालाथ नगर, शलमोनाची सर्व भांडारनगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे ह्या सर्वांची मजबुती केली; त्याप्रमाणेच यरुशलेमेत, लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शलमोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बालाथ नगर व अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरूशलेम, लबानोन व आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.