2 Chronicles 9:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तार्शीश येथे जाणारी गलबते त्याच्याकडे होती. हिरामची माणसे त्याच्या गलबतांतून मालाची ने - आण करीत. सोन - रुपे, हस्तिदंत, वानरे आणि मोर यांनी भरलेली ही गलबते दर तीन वर्षानी तार्शीशहून शलमोनाकडे येत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हूरामाच्या कामदारांबरोबर राजाची जहाजे तार्शीशास जात असत; तीनतीन वर्षांनी ही तार्शीशास जाणारी जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणीत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजाकडे समुद्रांवर गलबतांचा ताफा हिरामाच्या ताफ्यासोबत होता. तीन वर्षातून एकदा हा ताफा सोने, चांदी व हस्तीदंत ह्याप्रमाणे मोर व वानरे आणत.