2 Corinthians 1:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर असा बेत करताना मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय-नाही अशी धरसोड करता यावी म्हणून मी जी योजना करतो, ती स्वार्थी वृत्तीने करतो काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी हे बेत चंचलवृतीने केले काय? मी ऐहिक रीतीने माझ्या योजना करतो काय किंवा “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असा विचार करीत असता, मी चंचलपणा केला काय? किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला ‘होय, होय’ आणि ‘नाही, नाही’ असे म्हणतो काय?