2 Corinthians 1:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण देवाची वचने कितीही असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत, यामुळे त्याच्याद्वारे आम्हांकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे (आमेन).
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवाची वचने कितीही असोत, ख्रिस्तामध्ये ती होकारार्थीच असतात. म्हणून आम्ही देवाच्या गौरवासाठी त्याच्याद्वारे होकार देतो,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने कितीही अभिवचने दिलेली असोत, ख्रिस्तामध्ये ती “होय” आहेत. परमेश्वराच्या नावाचे गौरव करीत आम्ही त्यांच्याद्वारे “आमेन” म्हणतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.