2 Corinthians 10:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी पौल तुमच्यासमोर असताना तुमच्याशी लीनपणे व सौम्यतेने वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कठोरपणे वागतो, असे म्हटले जाते. मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो, तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हांला विनंती करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रपणाने मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्यापैकी काहीजण म्हणतात की मी पौल, तुमच्यासमोर असताना “भित्रा” व तुमच्यापासून दूर असलो म्हणजे “धीटपणे” वागतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.